जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विदर्भातील गोसिखुर्द पाटबंधारे घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्कर यांनी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली आहे. घाटकोपर येथे राहणाऱ्या जिगर ठक्कर यांनी मंगळवारी सायंकाळी मरिन ड्राइव्ह येथे स्वत:वर गोळी घालून आत्महत्या केली. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस तपास करीत आहेत. मंगळवारी सायंकाळी ठक्कर नरिमन पॉइंट येथे आले.
सायंकाळी 6.30 च्या सुमारास त्याने चालकास गाडी रस्त्याशेजारी उभी करण्यास सांगितले. चालकाला गाडीबाहेर पाठवून तो स्वत: आतच थांबला. काही वेळातच त्याने डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल दाखल केला आहे. तसेच, घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळालेली नाही.