जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यात महिला असुरक्षित असल्याचे आपणा सर्वांना माहितच आहे पण, आता तर जन्मलेले बाळदेखील सुरक्षित राहिलेले नाही. ठाण्यात रुग्णालायातून बाळ चोरीला गेल्याची घटना घडलीय. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालायातून नुकतेच जन्मलेले बाळ चोरीला गेले आहे. मोहिनी भुवर असे जन्मदात्या आईचे नाव असून त्या भिवंडीतील रहिवासी आहेत.
सिव्हिल रुग्णालायातील बाळ चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, एक महिला बाळ घेऊन जाताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.