Mumbai Best Bus : मुंबईतील सुमारे इतक्या बेस्ट बस सरकारच्या मालकीच्या नाहीत? एकनाथ शिंदेंच्या लेखी उत्तरातून समोर आली धक्कादायक माहिती

कंत्राटदारांकडील तब्बल 2500 बसेसच्या  जीवावर बेस्टची सेवा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Mumbai Best Bus : मुंबईतील सुमारे इतक्या बेस्ट बस सरकारच्या मालकीच्या नाहीत? एकनाथ शिंदेंच्या लेखी उत्तरातून समोर आली धक्कादायक माहिती

मुंबईतील परिवहन मंडळाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेस्टच्या ताब्यात असणाऱ्या बसेस या कंत्राटदारांच्या मालकीच्या असल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,  बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या केवळ 249 बसेस आहेत. तर या उलट कंत्राटदारांकडील तब्बल 2500 बसेसच्या  जीवावर बेस्टची सेवा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

एप्रिल 2024 मध्ये बेस्टच्या 1098 बस सेवेत होत्या. हीच संख्या आता कमी होऊन एप्रिल 2025 मध्ये 757 होती, तर सद्यस्थितीत मात्र बेस्टच्या स्वतःच्या केवळ 249 बसेस सेवेत उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत लेखी उत्तरात हि माहिती दिली आहे.

हेही वाचा – Ration Card verification : 'आता घरी जाऊनच…', रेशन कार्डधारकांसाठी धोक्याची घंटा, केंद्र सरकारने काढला नवा फतवा

याचदरम्याने काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी थकित हप्त्यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेला शब्द पाळत 24 फेब्रुवारीला कर्मचाऱ्यांचे थकित हप्ते देऊ केले. यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला होता. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number