Mumbai Airport: प्रवाशांनो लक्ष द्या; ‘या’ वेळेत एकही फ्लाइट टेकऑफ किंवा लँडिंग करणार नाही, मुंबई विमानतळ उद्या 6 तास राहणार बंद

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 7 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रनवे देखभालीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

Mumbai Airport: प्रवाशांनो लक्ष द्या; ‘या’ वेळेत एकही फ्लाइट टेकऑफ किंवा लँडिंग करणार नाही, मुंबई विमानतळ उद्या 6 तास राहणार बंद

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या गुरुवार, 7 मे रोजी 6 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत विमानतळावरून कोणत्याही प्रकारचे उड्डाण संचलन होणार नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केली जाणारी धावपट्टीची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मुंबईतून एकही विमान उडणार नाही किंवा कोणत्याही विमानाचे लँडिंग होणार नाही. विमानतळ व्यवस्थापन कंपनी 'मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड'ने ही माहिती दिली आहे.

दोन्ही धावपट्ट्यांचे 'शटडाऊन'

मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत मुंबई विमानतळाचे दोन्ही मुख्य रनवे देखभालीच्या कामासाठी बंद ठेवले जातील. मुंबईत मान्सून दरम्यान होणारा तुफान पाऊस आणि त्यामुळे उद्भवणारी पाणी साचण्याची समस्या लक्षात घेता, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलणे अत्यंत आवश्यक असते. या सहा तासांच्या कालावधीत धावपट्टीची पृष्ठभाग, तांत्रिक पायाभूत सुविधा आणि एअरसाईड यंत्रणेची सखोल तपासणी केली जाणार आहे.

वेळापत्रकात आधीच बदल

विमानतळ प्रशासनाने या बंदची तयारी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू केली होती. सर्व विमान कंपन्या आणि नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाशी समन्वय साधून बहुतेक विमानांच्या वेळापत्रकात आधीच बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाने अनेक उड्डाणे सकाळी 11 च्या आधी किंवा संध्याकाळी 5 नंतर नियोजित आहेत. मात्र, तरीही काही उड्डाणे रद्द होण्याची किंवा लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: Mamata Banerjee: ममतादीदी इरेला पेटल्या, मुख्यमंत्रिपद, सोडण्यास नकार; राज्यपाल अधिकार वापरणार? संविधानातील तरतूद काय?

प्रवाशांना डायव्हर्शनचा फटका?

विमानतळ बंद असल्यामुळे या सहा तासांच्या कालावधीत मुंबईत येणाऱ्या काही विमानांना पुणे, अहमदाबाद किंवा गोवा सारख्या जवळच्या विमानतळांवर वळवले (Divert) जाऊ शकते. तसेच लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना दिल्ली, बेंगळुरू किंवा चेन्नई सारख्या मोठ्या विमानतळांवरून मार्गस्थ केले जाण्याची शक्यता आहे. ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत किंवा बदलली आहेत, त्यांनी रिबुकिंग किंवा रिफंडसाठी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?

विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना सल्ला दिला आहे की, घरातून निघण्यापूर्वी त्यांच्या फ्लाईटची ताजी स्थिती एअरलाईनच्या किंवा अधिकृत वेबसाईटवर तपासून पहावी. तसेच संध्याकाळी 5 नंतर ज्यांची फ्लाईट आहे, त्यांनीही विमानतळावर जाण्यासाठी अतिरिक्त वेळ हातात ठेवावा. कारण 6 तासांच्या 'बॅकलग'मुळे विमानतळावर गर्दी होऊन पुढील उड्डाणांना उशीर होण्याची शक्यता आहे. विनाकारण होणारा त्रास टाळण्यासाठी प्रवाशांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून अपडेट्स घेत राहावे.

मान्सूनमधील सुरक्षिततेसाठी तयारी

मुंबईचे विमानतळ 1,033 एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले असून ते जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. दररोज 1000 हून अधिक विमानांचे संचलन करणाऱ्या या विमानतळाच्या धावपट्टीवर पावसाळ्यात मोठा ताण येतो. उच्च आर्द्रता, सततचा पाऊस आणि पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता रनवेची स्थिती सर्वोत्तम असणे गरजेचे आहे. तज्ज्ञांची एक विशेष टीम या सहा तासांत धावपट्टीच्या पृष्ठभागावरील झीज आणि इतर तांत्रिक गोष्टींची बारकाईने तपासणी करणार आहे.

नियोजनाने टाळली मोठी अडचण

याआधी मार्च महिन्यात पश्चिम आशियातील हवाई क्षेत्रातील काही समस्यांमुळे 170 हून अधिक उड्डाणे विस्कळीत झाली होती. मात्र, उद्याचा हा बंद पूर्णपणे नियोजित असल्यामुळे प्रवाशांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहण्याची गरज आहे. मुंबई विमानतळ हे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाचे केंद्र असल्याने, पावसाळ्यातील प्रवास सुसह्य आणि सुरक्षित व्हावा, याच उद्देशाने हे मान्सूनपूर्व 'मिशन' राबवले जात आहे.

हेही वाचा: Crime News: बंगालमध्ये विजयानंतर रक्ताचा सडा; भाजप आमदाराच्या भावाला निर्घृणपणे संपवलं, कोलकात्यात तणाव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number