Mumbai Airport Bomb Threat : आणखी एक धमकी! मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेलम; महत्त्वाची माहिती निष्पन्न

देशातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Mumbai Airport Bomb Threat : आणखी एक धमकी! मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेलम; महत्त्वाची माहिती निष्पन्न

देशातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी ईमेलद्वारे विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणांना पूर्णपणे सतर्क करण्यात आले असून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

ई-मेल मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला तातडीने सतर्क करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी विमानतळ परिसराची सखोल तपासणी केली. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक साहित्य आढळले नाही. धमकीच्या ई-मेलमध्ये विमानतळासह इतर ठिकाणीही हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता.

हेही वाचा- Fake Websites Scam: गुगल AI चा वापर करून गुगललाच चुना; चिनी हॅकर्सनी 10 लाख बनावट वेबसाइट्सद्वारे लूटले 1.75 लाख कोटी रुपये

प्राथमिक तपासात हा ई-मेल खोटा (होक्स) असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात BNS कलम 351(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. नुकतीच गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्याच्या आणि मुंबईच्या महापौरांना धमकीचा मेल आला होता.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एका अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची आणि त्यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. आता पुन्हा अशाच प्रकारचा मेल करण्यात आला. या वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे राजकीय वर्तुळात आणि सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. मात्र सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून कसून तपासणी सुरू आहे. पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number