जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई आणि ठाण्यात अपघात झालाय. दोन्ही अपघातांमध्ये कंटनेरखाली गाड्यांचा चक्काचूर झालाय.
मुंबईच्या मालाडमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावरून कंटेनर खाली कोसळला. हायवेखाली उभ्या असलेल्या वाहनावर हा कंटेनर कोसळला. त्यात वाहनाचा चक्काचूर झालाय.
कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर, दुसरीकडे ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील गायमुखजवळ मध्यरात्री अपघात झालाय.
चालता कंटेनर कारवर पडून हा अपघात झालाय. अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झालाय. तर ,1 जण जखमी झालाय. जखमींवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.