1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला जन्मठेप, तर दोघांना फाशी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तब्बल 24 वर्षानंतर 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी टाडा न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. आरोपी अबू सालेम, आरोपी करिमुल्लाह खान यांना जन्मठेप तर आरोपी ताहिर मर्चट, आरोपी फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी रियाज सिद्दिकी याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.   1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी […]

1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला जन्मठेप, तर दोघांना  फाशी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तब्बल 24 वर्षानंतर 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी टाडा न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. आरोपी अबू सालेम, आरोपी करिमुल्लाह खान यांना जन्मठेप तर आरोपी ताहिर मर्चट, आरोपी फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी रियाज सिद्दिकी याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी विषेश टाडा न्यायालयाने आरोपी अबू सालेम याला जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. हत्यारे गोळा करणे, हत्येचा कट रचणे, हत्यांरांची तस्करी करणे, घातक शस्त्र बाळगणे, याप्रकरणी अबू सालेमला दोषी ठरवण्यात आले होते.

 

अबू सालेमसह आरोपी करिमुल्लाह खान यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जन्मठेपेसोबतच करिमुल्लाह खानला 2लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शस्त्रास्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली करिमुल्लाला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

आरोपी रियाज सिद्दिकी याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुन्हेगारी कट रचणे याप्रकरणी रियाज सिद्दिकीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 

आरोपी ताहिर मर्चट, आरोपी फिरोज खान या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number