Mumbai Smart Card: मुंबईत प्रवास होणार आता ‘मुंबई 1 कार्ड’ने; बेस्ट, मेट्रो, मोनो, एसटी आणि लोकलसाठी एकाच कार्डची सोय

आता उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनोरेल, मेट्रो आणि राज्य बस सेवा (एसटी) वापरणाऱ्या नागरिकांसाठी एकाच कार्डवरून तिकीट घेणे शक्य होणार आहे.

Mumbai Smart Card:  मुंबईत प्रवास होणार आता ‘मुंबई 1 कार्ड’ने; बेस्ट, मेट्रो, मोनो, एसटी आणि लोकलसाठी एकाच कार्डची सोय

Mumbai Smart Card: आता उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनोरेल, मेट्रो आणि राज्य बस सेवा (एसटी) वापरणाऱ्या नागरिकांसाठी एकाच कार्डवरून तिकीट घेणे शक्य होणार आहे. यासाठी तयार करण्यात आले आहे ‘मुंबई 1 स्मार्ट कार्ड’ आणि त्यासोबत ‘मुंबई 1 ॲप’. हे कार्ड आणि ॲप सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून सुरू होती. आता ही प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे कारण बुधवारी, 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सुविधेचे लोकार्पण होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या एकात्मिक तिकीट प्रणालीची पूर्ण तयारी केली आहे. या कार्डद्वारे प्रवाशांना वेगवेगळ्या वाहतूक सेवांसाठी वेगवेगळे तिकीट खरेदी करण्याची गरज नाही राहणार. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि जलद होईल. विशेष म्हणजे, हे कार्ड वापरून उपनगरीय रेल्वेची स्थानिक सेवा, बेस्ट बस, मोनोरेल, मेट्रो आणि राज्य बस सेवा (एसटी) यामध्ये तिकीट सहज घेता येईल.

हेही वाचा: Mahavitaran News: सणासुदीत महागाईचा फटका! दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ, प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार
 

सध्या प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट खरेदी करावे लागतात, ज्यामुळे वेळ वाया जातो आणि प्रवाशांना त्रासही सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने ‘मुंबई 1 स्मार्ट कार्ड’ तयार करण्याचा निर्णय घेतला. एमएमआरडीएने या कार्डासाठी ॲपसह तंत्रज्ञानाची व्यवस्था तयार केली आहे. हे ॲप वापरूनही प्रवाशांना कार्ड जोडण्याची, तिकीट खरेदी करण्याची आणि प्रवासासाठी स्कॅन करण्याची सुविधा मिळणार आहे.

‘मुंबई 1 स्मार्ट कार्ड’मध्ये आधी तयार केलेल्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 मार्गांची माहितीही समाविष्ट केली गेली आहे. आता हे कार्ड मेट्रो 1, मेट्रो 3, मोनोरेल, बेस्ट, उपनगरीय रेल्वे आणि एसटीसाठी देखील वापरता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक कार्ड व तिकीट बुकिंगच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

हेही वाचा: PM Kisan update: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! PM Kisan हप्ते पुन्हा सुरू करण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध

एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पणानंतर हे कार्ड आणि ॲप अधिकृतपणे सेवेत दाखल होणार आहे. लोकार्पण नंतर प्रवाशांना कोणत्याही स्थानिक सार्वजनिक वाहतुकीसाठी एका कार्डवरून तिकीट घेता येईल. ही सुविधा शहरातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

एकाच कार्डवरून तिकीट खरेदी करणे आणि ॲपवरून प्रवासाची माहिती पाहणे यामुळे प्रवाशांना वेळ वाचेल, प्रवास अधिक सोपा आणि सुलभ होईल. ‘मुंबई 1 कार्ड’ ही सुविधा शहरातील लोकल, मेट्रो, मोनोरेल, बेस्ट आणि एसटी प्रवाशांसाठी एकत्रित केलेल्या सेवांचा अनुभव देणार आहे.

8 ऑक्टोबरपासून मुंबई प्रवाशांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ‘मुंबई 1 स्मार्ट कार्ड’ आणि ॲपच्या मदतीने आता लोकल, बेस्ट, मेट्रो, मोनो आणि एसटीसाठी स्वतंत्र तिकीट घेण्याची गरज नाही राहणार. प्रवाशांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ व जलद होईल.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number