जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील मुलुंड भागातील रहिवासी शनिवारी सकाळपासून बिबट्याच्या दहशतीत वावरत होते. अखेर पाच तासांच्या प्रयत्नांनंतरही बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं.
बिबट्याने आठ जणांना जखमी केल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड पूर्वेच्या नानेपाड्यात बिबट्या शिरला होता.
नानेपाडा भागातीलच एका इमारतीत बिबट्या लपला होता. वन विभागाचे कर्मचारी तीन तास बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करत होते. अखेर साडेअकरा नंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.