जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजप आमदाराची गाडी एका पोलीस स्थानकाला धडकल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.
सीसीटीव्हीत ही दृश्य कैद झाली आहेत. भाजप आमदाराची ही कार असून, ती भरधाव वेगात आली आणि मुलुंड येथील वाहतूक पोलीस स्थानकावर जाऊन जोरदार आदळली.
यामुळे कारचे आणि पोलीस स्थानकाचे मोठं नुकसान झाले. सीसीटीव्हीत कैद झालेली ही दृश्य पाहून अपघात किती भयानक होता याचा अंदाज येऊ शकतो. हा अपघात दोन दिवसांपूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे.