MSRTC News : आता चालक-वाहकांवर राहणार लक्ष! प्रवाशांच्या मदतीसाठी आता सरकारचं मोठं पाऊल, नवीन नियमावली समोर

.त्यावेळी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. 

MSRTC News : आता चालक-वाहकांवर राहणार लक्ष! प्रवाशांच्या मदतीसाठी आता सरकारचं मोठं पाऊल,  नवीन नियमावली समोर

प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि एसटीने प्रवास सुखकर व्हावा यासाठी महामंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अनेक मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले.त्यावेळी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. 

हेही वाचा – Sanjay Shirsat : या कारणांसाठी दिग्गजांना डावलून दिली ज्योती वाघमारेंना उमेदवारी; संजय शिरसाट यांनी सांगितलं नेमकं कारण 

त्याचप्रमाणे आता नव्या उपाययोजनांनुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांचीही ड्युटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक राहणार आहे. आगार व्यवस्थापकांनीही नियमित नियंत्रण ठेवून या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – Cabinet Decision : धारावीमध्ये आगीत घर गमावलेल्यांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा; 436 कुटुंबांना देवनारमध्ये मिळणार हक्काची जागा 

या बाबतीत दक्षता विभागाकडून वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मार्गतपासणी पथक, वाहतूक निरीक्षक, प्रशिक्षण विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातून तपासणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. तसेच आगारांमध्ये विशेष 'मद्यपान जनजागृती सप्ताह' आयोजित करून चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number