महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड वापरणे अनिवार्य करण्यात येणार आहे. प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
आतापर्यंत राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास 25 लाख कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच कार्यान्वित केली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून स्मार्ट कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. अशा प्रकारचं ट्वीट समोर आलं आहे.
एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष Pratap Sarnaik यांनी दिला आहे. निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा केंद्रांचे वितरण परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.