एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलं अघोषित संप, प्रवाशांचे झाले हाल…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राज्यात मध्‍यरात्रीपासून अचानक एसटी कर्मचा-यांनी कामबंदचे आंदोलन पुकारले आहे. पगारवाढीसह आपल्या इतर मागण्‍यांची पूर्तता व्हावी म्हणून कर्मचा-यांनी हा अघोषित संप पुकारला आहे. कोणत्याही कर्मचारी संघटनेने या संपाबाबत अधिकृत घोषणा न करता हा संप पुकारलेला आहे, त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. राज्यातील सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, या शहरांमध्येही हा संप […]

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलं अघोषित संप, प्रवाशांचे झाले हाल…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यात मध्‍यरात्रीपासून अचानक एसटी कर्मचा-यांनी कामबंदचे आंदोलन पुकारले आहे. पगारवाढीसह आपल्या इतर मागण्‍यांची पूर्तता व्हावी म्हणून कर्मचा-यांनी हा अघोषित संप पुकारला आहे. कोणत्याही कर्मचारी संघटनेने या संपाबाबत अधिकृत घोषणा न करता हा संप पुकारलेला आहे, त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

राज्यातील सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, या शहरांमध्येही हा संप पुकरण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. एसटी कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांना तातडीने मान्यता मिळावी या उद्देशाने हा संप पुकारला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number