MSRCTC Revenue Update : एसटी होणार मालामाल! आता 5 वर्षात मिळणार 250 पेक्षा अधिकचा महसूल, पण कसा?

एसटी महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासन आता मोठे निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे.

MSRCTC Revenue Update : एसटी होणार मालामाल! आता 5 वर्षात मिळणार 250 पेक्षा अधिकचा महसूल, पण कसा?

सध्या राज्याची लालपरी बस आता आर्थिक सक्षमतेच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासन आता मोठे निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. याबद्दल  प्रताप सरनाईकांनी माहिती दिली आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला 250 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. 

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बैठक पार पडली. यामध्ये परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी सरनाईकांनी स्पष्ट केले की, एसटीची पोहोच राज्यातील प्रत्येक गावखेड्यापर्यंत आहे. 

हेही वाचा – Flight Fare Hike : मध्यपूर्वेतील युद्धाचा प्रवाशांना मोठा फटका; लंडन-मुंबई विमान प्रवासासाठी मोजावे लागत आहेत 'इतके' पैसे 

यामध्ये महामंडळाची 251 आगारे, 610 बसस्थानके आणि सुमारे 12 हजार बसेसचा ताफा ही जाहिरातदारांसाठी मोठी बाजारपेठ आहे. या संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी बसेसचा बाहेरील आणि आतील भाग जाहिरातींसाठी उपलब्ध केला जाईल. परिणामी बसस्थानक परिसर आणि इमारतींचा वापर महसूल वाढीसाठी होईल. नव्या निविदा प्रक्रियेद्वारे पारदर्शकपणे कंत्राट देण्यात आले आहे.

हेही वाचा – Iran-Israel War Effect : 'बाबा, मी पलंगाखाली लपून राहीन…', दुबईत अडकलेल्या अभिनेत्याच्या 6 वर्षीय लेकीचे डोळ्यांत पाणी आणणारे शद्ब 

सध्या जाहिरातींतून वार्षिक 22 कोटी रुपये मिळतात. मात्र, नव्या निविदा प्रक्रियेमुळे या उत्पन्नात दुपटीहून अधिक वाढ होणार असून, वार्षिक सरासरी 50 कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळणे अपेक्षित आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number