यंदाच्या मृदगंध पुरस्काराचे मानकरी…

सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येतो. हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो.

यंदाच्या मृदगंध पुरस्काराचे मानकरी…

मुंबई : संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाहीर  विठ्ठल उमप यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा होणार आहे. हा सोहळा २६ नोव्हेंबर रोजी आयोजिण्यात आला आहे. सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येतो. हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. यावर्षी पुरस्कार प्राप्त नामवंत मंडळी कोण असतील या प्रश्नाचे उत्तर शनिवार ९ नोव्हेंबर रोजी मिळेल. फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप शनिवार ९ नोव्हेंबर पत्रकार परिषद पुरस्कार प्राप्त नामवंतांची नावं जाहीर करणार आहेत. 

याआधी पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार,पांडुरंग घोटकर, सुबोध भावे,  राजाराम  जामसांडेकर,  विक्रम  गोखले (जीवन गौरव ),  पद्मश्री  डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले,  डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव),  वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद  गज्वी, प्रशांत  दामले, अशॊक  वायंगणकर, प्राजक्ता  कोळी, रवींद्र  भिलारी, माया जाधव (जीवन गौरव), जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (जीवनगौरव), सुदेश भोसले, आतांबर शिरढोणकर, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, केतकी  माटेगावकर  हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number