एमपीएससी परीक्षेचा डाटा लीक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे. तर, परिक्षेला अवघा एक आठवडा असताना परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) टेलिग्रामवर लीक झालं आहे. याबाबत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेतली असून आयोगाने सायबर पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. येत्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, ‘क’च्या […]

एमपीएससी परीक्षेचा डाटा लीक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे. तर, परिक्षेला अवघा एक आठवडा असताना परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) टेलिग्रामवर लीक झालं आहे. याबाबत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेतली असून आयोगाने सायबर पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

येत्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, ‘क’च्या परीक्षाचे हॉल तिकीट लीक करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची माहिती उघड झाली आहे. टेलिग्रामवर ऍपवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक झाले आहे. तसेच, संबंधित परीक्षेची प्रश्नपत्रिकादेखील असल्याचा दावा या ऍपवर करण्यात आला आहे. टेलिग्रामवर परीक्षेचा डेटा लीक झाल्याची माहिती मिळताच, आयोगाने सायबर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच वस्तुस्थितीची पडताळणी केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, प्रश्नपत्रिका लीक होत नसताना, ते खोटे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्ण खरात यांनी दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट केले की, ‘जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number