खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटात

राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या शिंदे गटांच्या ४० आमदारांची आणि मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीला दिल्लीहून सेनेचे १२ खासदार ऑनलाईन उपस्थित होते. त्यात बुलडाण्याचे सेना खासदार प्रतापराव जाधवांचा समावेश होता. त्यामुळे जिल्ह्यातील २ आमदारांच्या पाठोपाठ शिवसेना खासदारही शिंदे गटाच्या उंबरठ्यावर असून केवळ अधिकृतरित्या फक्त घोषणा बाकी आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. […]

खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटात

राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या शिंदे गटांच्या ४० आमदारांची आणि मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीला दिल्लीहून सेनेचे १२ खासदार ऑनलाईन उपस्थित होते. त्यात बुलडाण्याचे सेना खासदार प्रतापराव जाधवांचा समावेश होता. त्यामुळे जिल्ह्यातील २ आमदारांच्या पाठोपाठ शिवसेना खासदारही शिंदे गटाच्या उंबरठ्यावर असून केवळ अधिकृतरित्या फक्त घोषणा बाकी आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. रात्री १२ वाजता शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. दिल्लीत जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडकोर खासदारांनी राजधानीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण सोबत केले आहे. दिल्लीत दाखल होताच एकनाथ शिंदे आधीच दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या खासदारांना भेटण्यासाठी गेले.

रात्रीच्या जेवणासाठी मुख्यमंत्र्यांसोबत कृपाल तूमाने, हेमंत गोडसे, धैर्यशील माने,राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे सदाशिव लोखंडे,भावना गवळी, संजय मंडलिक,श्रीकांत शिंदे यांच्यासह बारा खासदार उपस्थित होते. १२ खासदार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, सध्या दिल्लीत थांबलेल्या खासदरांना घेऊन एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.  शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आमदारांपाठोपाठ नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मीरा भाईंदर येथील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर आता शिवसेनेच्या 14 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे शिंदे गटाकडे  शिवसेना पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number