मिटकरींच्या भाषणावरून गोंधळ

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात सांगली येथे झालेल्या यात्रेत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची आक्रमक भाषणे झाली. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या भाषणाचे अनेक पडसाद उमटले. अमोर मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे पुण्यात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला असून पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आंदोलन केले. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान […]

मिटकरींच्या भाषणावरून गोंधळ

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात सांगली येथे झालेल्या यात्रेत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची आक्रमक भाषणे झाली. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या भाषणाचे अनेक पडसाद उमटले. अमोर मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे पुण्यात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला असून पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आंदोलन केले. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाली.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मंत्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, आमदार अमोल मिटकरी यांची आक्रमक भाषणे झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी मिटकरींनी त्यांच्या भाषणात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर हल्लाबोल केला.

बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या काही उताऱ्यांचे वाचन करत याबद्दल राज ठाकरे का बोलत नाहीत असा सवाल उपस्थित केलाय. जिजाऊंची बदनामी करणारा मजकूर पुरंदरे लिहितात हे राज ठाकरेंना का दिसत नाही? असंही ते म्हणाले आहेत. तसेच हनुमान चालीसा पठणाचा वादातीत मुद्द्यावर टिपणी करत, हनुमान चालीसा स्पिकरवर लावणाऱ्यांना स्वतःला तरी हनुमान चालीसा येते का? असा प्रश्न उपस्थित करुन मिटकरी यांनी हनुमान चालीसा आणि मारुती स्त्रोत्र म्हणून दाखविले.

धनंजय मुंडे यांनी ही याप्रसंगी भाषण करत विरोधकांवर टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपचे अर्धवटराव आहेत असं म्हणत धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. तर, देशाचा पाकिस्तान होताना दिसतोय असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी मिटकरींनी केलेल्या या भाषणाचे अनेक पडसाद उमटत असून आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number