राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीने दिलेल्या नोटीसीनंतर राज्यात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि वाशीममध्ये काँग्रेसने जोरदार आंदोलने केली. गुरुवारी मुंबईत देखील राजभवनावर धडकण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता.नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेधाचे फलक घेत आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन छेडण्यात आले. यावेळी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकार विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सूडबुद्धीनं करण्यात येत आहे. हा गैरवापर तत्काळ थांबवावा अशी मागणी करत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधींच्या पुतळ्यास समोर धरणे आंदोलन सुरु केलं. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे.
काँग्रेसनं जिल्हाधिकारी कर्यालयासमोर आंदोलन केलं. हिंगोलीतही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आमदार प्रज्ञा सातव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॉग्रेसच्या आंदोलनात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. हमदनगर जिल्ह्यातील संगमनेमध्ये पोलीस आणि आंदोलकांना बसला दे धक्का देण्याची वेळ आली. संगमनेरमध्ये आज बसस्थानकासमोर केंद्र सरकार विरोधात काँग्रेसनं धरणे आंदोलन सुरु केल असताना परिवहन महामंडळाची बस अचानक बंद पडली.
बराच वेळ प्रयत्न करुनही बस सुरु होवू शकली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सुरु असलेली ईडीची कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत या कारवाई विरोधात परभणीत काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ईडीमार्फत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चौकशीच्या कारवाई विरोधामध्ये औरंगाबादेत काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलया समोर आंदोलन सुरु केलं. अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी काँग्रेसने आंदोलने केली आह.