खालापूरातील इरशाळवाडीवर दुःखाचा डोंगर

महाराष्ट्राची आजची पहाट अत्यंत दुखद बातमीनं झाली आहे. गाढ झोपलेल्या खालापुरातील इरशाळवाडीवर दरडीने शोककळा पसरली आहे. रायगड परिसरातील मोरबे धारणाच्या वरील बाजूस असलेल्या इरशाळवाडीवर गुरुवारी (दि.२० जुलै २०२३) रात्री ११ वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरडीत चार जणांचा मृत्यू झाला असून १०० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच तेथील […]

खालापूरातील इरशाळवाडीवर दुःखाचा डोंगर

महाराष्ट्राची आजची पहाट अत्यंत दुखद बातमीनं झाली आहे. गाढ झोपलेल्या खालापुरातील इरशाळवाडीवर दरडीने शोककळा पसरली आहे. रायगड परिसरातील मोरबे धारणाच्या वरील बाजूस असलेल्या इरशाळवाडीवर गुरुवारी (दि.२० जुलै २०२३) रात्री ११ वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरडीत चार जणांचा मृत्यू झाला असून १०० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच तेथील लोकांच्या बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोचण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरत आहे. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले आणि सर्जेराव सोनावणे हे घटानास्थळी पोहोचले आहेत.

या घटनेत १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २५ लोकांची सुटका करण्यात यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. या गावात ५० ते ६० घरांची वस्ती असून जवळपास २०० ते ३०० मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे ३० ते ४० घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनास्थळी बचावासाठी डॉक्टरांसह ४ रुग्णवाहिका चौक येथे मदतकार्यासाठी पोहोचल्या आहेत. एनडीआरएफचे बचावकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेली दरड कोसळणे आणि जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडचण निर्माण होत आहे. आता पर्यंत २५ लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. यात ४ जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number