आईची मजबूरी की निर्दयता? शिर्डीतील घटनेमागील हृदयद्रावक सत्य

शिर्डी बस स्थानकावर एका महिलेने आपल्या लहान मुलांना साखळदंडाने बांधल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यानंतर प्रशासनाने तिला तिथून बाहेर काढले.

आईची मजबूरी की निर्दयता? शिर्डीतील घटनेमागील हृदयद्रावक सत्य

 

शिर्डी बस स्थानकावर एका महिलेने आपल्या लहान मुलांना साखळदंडाने बांधल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यानंतर प्रशासनाने तिला तिथून बाहेर काढले. पाहणाऱ्यांना हा प्रकार धक्कादायक वाटला, मात्र जेव्हा या महिलेची चौकशी करण्यात आली, तेव्हा समोर आलेली कहाणी मन हेलावून टाकणारी होती.

ही आई उच्चशिक्षित असूनही परिस्थितीने तिला रस्त्यावर आणले. पतीने सोडून दिल्यावर तिला आपल्या मुलांचे पालनपोषण करणे कठीण झाले. कोणताही आधार नसल्याने तिने भंगार गोळा करण्याचा व्यवसाय पत्करला. तिची मुलं अजून लहान असल्याने आणि रस्त्यावरील धोक्यांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठीच तिने त्यांना साखळदंडाने बांधून ठेवले होते.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number