जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
परदेशातून दीड वर्षांनी आपल्या घरी परत आलेल्या मुलाला घरात आपल्या आईचा सांगाडा बघावा लागला. मुंबईतील लोखंडवाला भागात ही घटना घडली.
आशा सहानी असं या मृत महिलेचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा मुलगा तब्बल दीड वर्षानंतर घरी परतला होता. जेव्हा त्याने घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या आईचा शरीराचा
सांगाडा बेडवर होता.
आशा यांचा मुलगा रितुराज साहनी अमेरिकेत आयटी इंजीनिअर आहे. आपल्या कुटुंबासोबत तो अमेरिकेत राहत होता. तब्बल दीड वर्षांपासून रितुराज याचं आपल्या
आईसोबत कुठलही बोलणं झालं नव्हतं.