पावसाळ्यात वातावरण जरी आल्हाददायक असले तरी याच ऋतूमध्ये सर्वात जास्त सूक्ष्म जीवांमुळे आजार पसरतात. पावसाळ्यातील वातावरण या सूक्ष्म विषाणूंसाठी अधिक सोयीस्कर ठरते. त्यामुळे विषाणूजन्य आजार लगेच पसरतात. यापैकीच एक आहे ‘व्ही कॉलरी बॅक्टेरिया’.
कॉलराचा हा बॅक्टेरियाने शरीरात प्रवेश करतो तेव्हाकेल्यानंतर तो आतड्यामध्ये त्वरीत पसरतो आणि काही तासातच शरीरातील पूर्ण पाणी शोषून घेतो. हाच आजार म्हणजे कॉलरा. यावर त्वरित उपचार केला न केल्यास, रूग्णाचा मृत्यू निश्चित आहे. या आजाराची लक्षणे आणि यापासून कसे वाचता येऊ शकते हे जाणून घेऊया :
कॉलरा हा विषाणूजन्य रोग असून यामुळे शरीरातील पाणी अत्यंत वेगाने जंत शोषून घेतात आणि संपूर्ण पाणी शरीराबाहेर निघते. संक्रमित अन्न वा पाणी पिण्यामुळे १२ तासापासून ते ५ दिवसात अचानक कॉलराची लक्षणं दिसू लागतात आणि हे त्वरीत तीव्र होते.
जागतिक आरोग्य संघनेनुसार, संपूर्ण जगात साधारण १३ ते ४० लाख कॉलरा रूग्ण आहेत. तर २१ हजारापासून १.४३ लाख इतके मृत्यू या आजारामुळे होतात. लक्षणे दिसताच त्वरीत उपाय न केला गेल्यास, मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो.
कॉलराचे विषाणू हे खराब पाण्यातून जे साधारण जमीन, रस्त्यावर असते त्यातून अथवा रस्त्यावरील अन्न, कच्ची फळं आणि भाज्यांमधून पसरतो. सदर माध्यमातून कोणत्याही स्वरूपात विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतो आणि आतड्यापर्यंत पोहचून माणसाला आजाराने संक्रमित करतो. जिथे अधिक घाण आणि अस्वच्छता असते तिथे अधिक प्रमाणात हा आजार पसरतो.
अनेकदा कॉलराचा विषाणू शरीरात गेलाय याबाबत त्वरीत कळत नाही. याची लक्षणे ७ ते १४ दिवसात दिसू लागतात. पण या व्यक्तीमुळे अर्थात त्याच्या मलमूत्रावाटे कॉलरा अधिक पसरू लागतो.
डायरिया वा जंत – विषाणू आतड्यामध्ये पसरतो आणि त्यामुळे रूग्णाच्या शरीरातून तरल पदार्थ निघू लागता. एक तासाच्या आत १ लीटर फ्लुईड शरीरातून बाहेर निघते.
उलटी वा मळमळ – कॉलराची सुरूवात ही सतत मळमळ अथवा उलट्यांपासून होते. पण एका तासातच जुलाब सुरू होतात आणि शरीरातून पाणी निघू लागते.
चिडचिडेपणा – शरीरातून अचानक पाणी कमी झाल्याने शरीर कमकुवत होते आणि साहजिक चिडचिड होते
अधिक तहान लागणे – कॉलरा झालेल्या रूग्णाला अत्याधिक तहान लागते. तोंड आणि घसा सुकतो आणि अत्यंत थकवा येतो. त्वचा आकसते आणि लघ्वी होत नाही. रक्तदाब अचानक कमी होतो.