तब्बल 10 वर्षानंतर मोशे मुंबईत, नरीमन हाऊस येथे नेतन्याहुंना भेटणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 2008 मध्ये झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात आई वडील गमावलेला चिमुरडा मोशे होल्ट्सबर्ग मंगळवारी मुंबईत दाखल झाला. तो नरीमन हाऊसला जाणार आहे. मोशेबरोबर त्याचे आजोबा रब्बी होल्ट्सबर्ग नचमॅनही आले आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी मोशेने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी मोशेने मोदींना सांगितले, ‘माझे आई […]

तब्बल 10 वर्षानंतर मोशे मुंबईत, नरीमन हाऊस येथे नेतन्याहुंना भेटणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

2008 मध्ये झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात आई वडील गमावलेला चिमुरडा मोशे होल्ट्सबर्ग मंगळवारी मुंबईत दाखल झाला. तो नरीमन हाऊसला जाणार आहे. मोशेबरोबर त्याचे आजोबा रब्बी होल्ट्सबर्ग नचमॅनही आले आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी मोशेने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यावेळी मोशेने मोदींना सांगितले, ‘माझे आई वडील मुंबईत यहुदी आणि इतरांबरोबर राहत होते. त्यांचे घर सर्वांसाठी खुले असायचे. मी आता इस्रायलमध्ये माझ्या आजी-आजोबा सोबत राहतो. मला मुंबईत जाता येईल अशी आशा आहे. जेव्हा, मी म्हातारा होईल तेव्हा, आमच्या चाबाद हाऊसचा डायरेक्टर बनेन’. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूदेखील सध्या 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

गुरुवारी ते नरीमन हाऊसलाही जाणार आहेत. त्यावेळी मोशे त्यांची भेट घेणार आहे. मोशे आणि त्याच्या कुटुंबाला भारताने ऑगस्टमध्ये 10 वर्षांचा व्हिजा दिला आहे. या काळात ते कितीही वेळा भारतात येऊ शकतात.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number