वृत्तसंस्था, नवी दिल्ली
लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. यंदाचा मान्सून समाधानकारक असणार आहे.
सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.
अल निनोचा इफेक्ट असला तरी त्याचा फारसा प्रभाव दिसून येणार नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केले.
गेल्या वर्षीपेक्षा यंदाचं पावसाचं प्रमाण कमी आहे. 20116 मध्ये जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
पण तेव्हा अंदाजाच्या सरासरी 97 टक्के पाऊस पडला. त्यामुळे यंदाही पाऊस समाधानकारक पडून शेत शिवार बहरू दे अशीच प्रार्थना शेतकरी करत आहेत.