Monsoon Update: विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा कोसळणार धो धो पाऊस; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा, कोकणासह ‘हे’ जिल्हे…

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली असून आता पिकांच्या वाढीसाठी पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे आगामी पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Monsoon Update: विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा कोसळणार धो धो पाऊस; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा, कोकणासह ‘हे’ जिल्हे…

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत कोरडे वातावरण होते. मात्र जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून मॉन्सून सक्रिय झाला आणि जुलैच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने जूनची उणीव काही प्रमाणात भरून काढली. सध्या मात्र पावसाचा जोर पुन्हा कमी झाला असून अनेक भागांत उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जारी केला आहे. सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी पुढील चार ते पाच दिवसांत पुन्हा मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः कोकणासह राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली असून आता पिकांच्या वाढीसाठी पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे आगामी पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 भारतीय हवामान विभागाने 13 जुलैपासून पुढील काही दिवस राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.आज महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या सुमारास अनेक ठिकाणी कडक ऊन पडून उकाड्याची तीव्रता वाढू शकते. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये हवामानाने पुन्हा रौद्ररूप धारण केले आहे. डोंगराळ भागात काळ्या ढगांची दाटी झाली असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्लाही दिला आहे.

हवामान विभागाने पुढील 12 तासांत उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड आणि आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे.  तालात 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number