Monsoon Update: हवामान विभागाचा मोठा इशारा! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता, जाणून घ्या

याआधी 11 जून आणि 15 जून अशी तारीख सांगितली गेली होती, मात्र वारंवार बदललेल्या अंदाजांमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Monsoon Update: हवामान विभागाचा  मोठा इशारा!  ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता, जाणून घ्या

15 जून 2026 पासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मॉन्सूनने पुन्हा एकदा आपली दिशा बदलली आहे. सध्या मॉन्सून अरबी समुद्रातच अडकलेला असून त्याची पुढील वाटचाल थांबली आहे. अफगाणिस्तानकडून आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे मॉन्सून पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झाला आहे. हे वारे कमी होईपर्यंत मॉन्सूनची स्थिती जैसे थे राहण्याची शक्यता आहे.

आता मुंबईसह राज्यात मॉन्सून 20 जूनच्या सुमारास दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याआधी 11 जून आणि 15 जून अशी तारीख सांगितली गेली होती, मात्र वारंवार बदललेल्या अंदाजांमुळे शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीची कामे रखडली असून भूजल पातळीही कमी होत चालली आहे.

त्यातच यंदा एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभागानेही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत सूचना मिळेपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या राज्यात तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्यामुळे हवामानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी राहू शकते आणि काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर जगातील विविध हवामान संस्थांनी आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे.  20 जूनच्या सुमारास राज्यातील बहुतांश भागांमध्ये मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number