जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
झुंडशाहीने केल्या जाणाऱ्या हत्या, काश्मीर, सिक्किममधील तणाव, शेतकऱ्यांचे आंदोलन, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून होत असलेली कारवाई या मुद्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
गोरक्षकांचा धुडगूस, पाकिस्तान आणि चीनबरोबरील संघर्ष, जमावाकडून हत्या यांसारख्या मुद्दय़ांवर आजपासून चालू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरण्याचे मनसुबे विरोधी पक्षांनी आखल्याचं दिसत आहे.