विनयभंगाची तक्रार करायला गेली आणि…

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे विनयभंग, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी एकीकडे सर्वच स्तरातून प्रोत्साहन मिळत आहे. दुसरीकडे मात्र न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढलेल्या महिलेला या व्यवस्थेचाच वाईट अनुभव आला आहे. शेजारच्याने आंघोळ करतानाचा लपून व्हिडिओ चित्रीत केल्याची तक्रार घेऊन एक महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली. पुरावा म्हणून तिने मोबाईलमधील व्हिडिओसुद्धा सादर […]

विनयभंगाची तक्रार करायला गेली आणि…

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

विनयभंग, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी एकीकडे सर्वच स्तरातून प्रोत्साहन मिळत आहे.

दुसरीकडे मात्र न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढलेल्या महिलेला या व्यवस्थेचाच वाईट अनुभव आला आहे. शेजारच्याने आंघोळ करतानाचा लपून व्हिडिओ चित्रीत केल्याची तक्रार घेऊन एक महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली.

पुरावा म्हणून तिने मोबाईलमधील व्हिडिओसुद्धा सादर केला. मात्र, हा व्हिडिओ कोण्या महिला पोलिसाने पाहण्याऐवजी एकामागून एक पोलीस स्टेशनमधील सर्व पुरुष पोलिसांना पाहिली आणि आपल्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यास गेलेल्या महिलेवर अंतर्मुख होण्याची वेळ ओढवली.

ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये ही धक्कादायक बाब घडली आहे. अखेरीस आपल्यावरील या प्रसंगाला वाचा फोडण्याकरता पीडितेन थेट सिस्टीमविरोधात लढा उभारला.

तिच्या या लढ्यात ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदेंची तिला साथ मिळाली. महापौरांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून महिलांची तक्रार महिला पोलिसांनीच घ्यावी. तसेच महिलांना तक्रार करण्यासाठी वेगळ्या कक्षाची मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number