जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कमला मिल कंपाऊंडमधील आगप्रकरणी ‘मोजो बिस्ट्रो’ पबच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. तर, मोजोसच्या मालकांपैकी युग पाठकला पोलिसांनी अटक केलीय.
मोजोचा मालक युग पाठक हा माजी पुणे कमिश्नर के.के. पाठक यांचा मुलगा आहे.
आग नेमकी कुठून आणि कशामुळे लागली हे स्पष्ट झाल्यानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील आठवड्यात कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीत ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्ट्रो’ हे दोन पब जळून खाक झाले होते. तसंच, 14 जणांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी ‘वन अबव्ह’च्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या आगीचं मूळ ‘मोजो बिस्ट्रो’मध्ये होतं. तिथूनच आगीला सुरुवात झालीय. नंतर ही आग भडकत जाऊन ‘वन अबव्ह’लाही तिची मोठी झळ लागली, असं चौकशीतून समोर आलंय. त्यामुळं आता ‘मोजो बिस्ट्रो’चे मालक युग पाठक आणि युग तुली यांच्यासह पबच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान, कमला मिल कंपाऊंड परिसरातील आग प्रकरणी महापालिका आता चांगलंच कडक धोरण अंबवलंतेय. कमला प्रकरणातील फरार असलेल्या रेस्ट्रोबार वन अबव्हच्या तीनही मालकांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस महापालिकेनं बक्षीस जाहीर केलंय. आरोपींची माहिती देणाऱ्यास एक लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय.