वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं पाहिजे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. कर्नाटकमधील उडुपीमध्ये सुरु असलेल्या धर्मसंसद दरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं.
सर्वोच्च न्यायालयात 5 डिसेंबरला अयोध्या प्रकरणी अंतिम सुनावणी होणार आहे. त्याआधी मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. मोहन भागवत बोलले आहेत की, ‘राम मंदिरावर लवकर भगवा झेंडा फडकताना दिसेल. राम जन्मभूमीवर दुसरं कोणतंच बांधकाम होऊ शकत नाही’. राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं आणि त्याच दगडाने त्याचं बांधकाम केलं जाईल असं मोहन भागवत बोलले आहेत.
तर, मोहन भागवत यांच्या या वक्तव्याचा संदर्भ देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत विधेयक मांडलं पाहिजे .