‘महाराष्ट्राबाबतचे मोदींचे वक्तव्य दुर्दैवी’ – सुप्रिया सुळे

देशभरात कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रांबातचे पंतप्रधानांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान मोदी असे का बोलले? याचे वाईट वाटत आहे. पंतप्रधान […]

‘महाराष्ट्राबाबतचे मोदींचे वक्तव्य दुर्दैवी’ – सुप्रिया सुळे

देशभरात कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रांबातचे पंतप्रधानांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान मोदी असे का बोलले? याचे वाईट वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा उल्लेख कोविड स्प्रेडर असा केला. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मोदी हे भाजपचे नाही, तर देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांवर आम्ही नाराज नाही, पण हैराण आहोत. त्यामुळे आमच्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असे का बोलले? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून धावल्या. तसेच महाराष्ट्रातूनही ट्रेन्स चालवण्यात आल्या. रेल्वे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. ट्रेन महाराष्ट्र नाही तर केंद्र सरकार चालवते. आमच्याकडे रेल्वे नाही, आमच्याकडे एसटी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल असे वक्तव्य केल्यामुळे दु:ख होत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number