वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते.
मोदींच्या या नव्या टीममध्ये 2 आयएएस, 1 आयपीएस तर एक आयएफएस अशा निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
मोदींच्या या नवरत्न टीममध्ये महाराष्ट्राला मात्र स्थान मिळालेलं नाही. निवडक नोकरशहांमार्फत राज्य कारभार हाकणे पसंत करणाऱ्या मोदींनी यावेळी थेट
मंत्रिमंडळामध्येच 4 सनदी अधिकाऱ्यांना स्थान दिले.
कुणाला कोणतं खातं मिळाले?
कॅबिनेट मंत्री
सुरेश प्रभू – वाणिज्य
पियुष गोयल – रेल्वे
उमा भारती – पेयजल आणि स्वच्छता
धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि कौशल्यविकास
नितीन गडकरी – रस्ते वाहतूकसह गंगा स्वच्छता अभियानचा अतिरिक्त भार
स्मृती इराणी – माहिती प्रसारण आणि वस्त्रोद्योग
राज्यवर्धन राठोड – क्रीडामंत्री
आर. के. सिंग – ऊर्जा (स्वतंत्र कारभार)
निर्मला सीतारामन – संरक्षणमंत्री
मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याकमंत्री
राज्यमंत्री
सत्यपाल सिंग – शिक्षण राज्यमंत्री
गजेंद्र शेखावत – कृषी राज्यमंत्री
हरदीपसिंग पुरी – नगरविकास, गृहनिर्माण स्वतंत्र प्रभार
नरेंद्र तोमर – ग्रामविकास राज्यमंत्री
अल्फोन्स कन्ननाथनम् – पर्यटन, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
महेश शर्मा – संस्कृती आणि पर्यावरण राज्यमंत्री
शिवप्रताप शुक्ल – अर्थ राज्यमंत्री
अश्विनी कुमार चौबे – आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्री
डॉ. वीरेंद्र कुमार – महिला व बालविकास, अल्पसंख्याक राज्यमंत्री
अनंतकुमार हेगडे – कौशल्यविकास राज्यमंत्री
आर. के. सिंह – ऊर्जा मंत्रालय स्वतंत्र प्रभार