पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते २२,६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण होणार आहे.

पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर

२५ सप्टेंबर, बुधवार, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते २२,६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील १०,४०० कोटी रुपये खर्चाच्या विविध उपक्रमांचे उदघाटन आणि लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे उद्घाटन होणार  आहे. बिडकीन औद्योगिक क्षेत्राचेही पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number