पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पुण्यात दाखल झाले. त्यांना पुण्यात मंगळवारी लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्या पासूनच ह्या पुरस्कार सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार यावर चर्चा रंगल्या होत्या, विशेषतः शरद पवारांच्या उपस्थित रोहित टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी याना पुरासकर देण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या पावन भूमीत येण्यास मिळणं भाग्यचं, असं म्हणत मराठीतुन भाषणाला सुरुवात करून त्यांनी पुणेकरांच मन जिंखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी टिळकांबद्दल देखील भाष्य केलं. तसेच पुणेरी पगडी, उपरणं, मानचिन्ह आणि १ लाख रुपयांचा धनादेश, अश्या स्वरूपात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.