वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ‘परा’चा कावळा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलीय.
देशातील राजकारणात भूकंप घडविणा-या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी दोषमुक्त केलंय.
यावर चव्हाण म्हणाले, मे 2014ची लोकसभा निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर झालीये. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्धिमाध्यमांना हाताशी धरून २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला.
घोटाळा झालेला नसतानाही तसे असल्याचे दाखवून वातावरण निर्मिती करण्यात आली असल्याचं चव्हाण म्हणालेत.