मुंबईत मानसी दिक्षीत या 20 वर्षीय मॉडेलची हत्या झाल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी आरोपी मुझम्मील सय्यद या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
धक्कादायक म्हणजे या मॉडेलचा खून करुन तिचा मृतदेह बॅगेमध्ये भरुन रस्त्यावर फेकण्यात आला होता पण खबऱ्याने दिलेल्या माहितीमुळे अवघ्या 2 तासांत ही घटना उघडकीस आली.
गोरेगावजवळच्या बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली, पोलिसांनी तातडीने तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पाठवला,तिच्या हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.