जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झालं आहे. मोडकसागर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले.
आज सकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी मोडक सागर धरण दुथडी भरुन वाहू लागलं. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता लवकरच मिटणार आहेत.
मोडकसागरची 535.26 मीटर तलावाची क्षमता आहे. या तलावातून मुंबईला दररोज 3 हजार 750 दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो.