या मोबाइल चोरांनी ‘येथे’ घेतलं चोरीचं ऑनलाईन प्रशिक्षण…

 तंत्रज्ञानाचा वापर हा कोण कशारीतीने करेल, याचा काही नेम नाही. वर्ध्यातील तीन मोबाईल चोरांनी ‘चोरी कशी करायची’ याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण चक्क ‘यूट्युब’ वरून घेतलं. या चोरांनी मोबाईलच्या दुकानात चोरी केल्यानंतर जेव्हा या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे, तेव्हा या गोष्टीचा उलगडा झाला. या तीन चोरांपैकी दोन चोर अल्पवयीन आहेत. ही मुले शहरातील […]

या मोबाइल चोरांनी ‘येथे’ घेतलं चोरीचं ऑनलाईन प्रशिक्षण…

 तंत्रज्ञानाचा वापर हा कोण कशारीतीने करेल, याचा काही नेम नाही. वर्ध्यातील तीन मोबाईल चोरांनी ‘चोरी कशी करायची’ याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण चक्क ‘यूट्युब’ वरून घेतलं.

या चोरांनी मोबाईलच्या दुकानात चोरी केल्यानंतर जेव्हा या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे, तेव्हा या गोष्टीचा उलगडा झाला. या तीन चोरांपैकी दोन चोर अल्पवयीन आहेत. ही मुले शहरातील उच्चशिक्षित आणि नामांकित घरच्या कुटुंबातील आहेत. या चोरट्यांकडून मोबाईल तसंच चोरीसाठी वापरण्यात आलेली गाडी असा एकूण दीड लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

या चोरट्यांनी ज्या दुकानात कॅमेरे लागले नाहीत अशाच दुकानात जाऊन हे चोरटे चोरी करीत असायचे आणि चोरलेला माल olx च्या माध्यमातून विकल्याचे समोर आले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number