उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराच्या परिसरामध्ये मोबाईल फोन वापराला आणि छायाचित्र तसेच व्हिडिओ काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. केदारनाथ येथे एका युवतीने तिच्या प्रियकराला मागणी घातल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या प्रसारित होत असून या पार्श्ववभूमीवर ही बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात याबाबत फलक लावले आहेत. ‘मंदिर परिसरात मोबाईल नेण्यास आणि छायाचित्र अथवा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे’ अशी सूचना या फलकांवर लिहिण्यात आली आहे.