घरबसल्या फक्त 3 स्टेपमध्ये लिंक करा तुमचं आधार कार्ड

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   येत्या एक डिसेंबरपासून तुमचं मोबाइल सिमकार्ड आधार क्रमांकाला लिंक करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या स्टोअरपर्यंत जाण्याची आवश्यकता नसेल. कारण घरबसल्या OTP अर्थात वन टाईम पासवर्ड किंवा फोनवरील IVR सर्विसद्वारे किंवा मोबाईल एपचाही वापर करून ग्राहकांना आपला मोबाइल आधार क्रमांकाशी सहज जोडता येणार आहे. दूरसंचार मंत्रालयानं गेल्याच महिन्यात 3 पर्यायांचा उपयोग करून मोबाइल क्रमांकांची […]

घरबसल्या फक्त 3 स्टेपमध्ये लिंक करा तुमचं आधार कार्ड

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

येत्या एक डिसेंबरपासून तुमचं मोबाइल सिमकार्ड आधार क्रमांकाला लिंक करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या स्टोअरपर्यंत जाण्याची आवश्यकता नसेल. कारण घरबसल्या OTP अर्थात वन टाईम पासवर्ड किंवा फोनवरील IVR सर्विसद्वारे किंवा मोबाईल एपचाही वापर करून ग्राहकांना आपला मोबाइल आधार क्रमांकाशी सहज जोडता येणार आहे.

दूरसंचार मंत्रालयानं गेल्याच महिन्यात 3 पर्यायांचा उपयोग करून मोबाइल क्रमांकांची पुनर्तपासणी करण्यास मान्यता दिली होती.

या शिवाय दूरसंचार विभागानं बायोमेट्रिक पध्दतीनंही वयोवृद्ध ग्राहकांच्या घरी जाऊन मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडण्याला मान्यता दिलेली आहे. अशी माहिती‘UIDAI’चे CEO अजयभूषण पांडे यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number