…अजून किती काळ गाफील राहणार, व्हिडिओद्वारे मनसेचा सवाल

भारतात असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी मनसे ९ फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. काय आहे व्हिडिओमध्ये ? मोहलल्ल्यांधून देशविरोधी कारवाया करणाऱ्यां विरोधात तसेच  देशाला पोखरणारी वाळवी उखडून टाकण्यासाठी, ही लढाई आहे, असा या व्हिडिओतून म्हटलं आहे. भारत माझा देश आहे.  पाकिस्तानी  आणि  बांगदेशी […]

…अजून किती काळ गाफील राहणार, व्हिडिओद्वारे मनसेचा सवाल

भारतात असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी मनसे ९ फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?

मोहलल्ल्यांधून देशविरोधी कारवाया करणाऱ्यां विरोधात तसेच  देशाला पोखरणारी वाळवी उखडून टाकण्यासाठी, ही लढाई आहे, असा या व्हिडिओतून म्हटलं आहे.

भारत माझा देश आहे.  पाकिस्तानी  आणि  बांगदेशी घुसखोरांचा नाही. त्यांना भारतातून हाकलायलाच हवं , असं या व्हिडिओद्वारे सांगण्यात आलं आहे.

राज ठाकरे यांनी २३ जानेवारीच्या मुंबईतील अधिवेशनात हा मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मोर्च्याला मोर्च्याने उत्तर देणार असल्याचं, राज ठाकरे म्हणाले होते.

मनसेकडून जनतेला आवाहन

मनसेकडून जनतेला आवाहन करण्यात आलं आहे. देशातील घुसखोरांना हाकलण्यासाठी मनसेच्या मोर्च्यात सामील होण्याचं आवाहन मनसेने केलं आहे.

रविवारी ९ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता या मोर्च्याला सुरुवात होणार आहे.  या मोर्च्याला गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखान्यापासून सुरुवात होणार आहे. तर या मोर्च्याचा शेवट आझाद मैदानात होणार आहे.

दरम्यान याआधी मनसेने मोर्चा काढला होता. रझा अकादमीच्या आंदोलकांनी महिला पोलिसांवर हात घातल्यानंतर याविरोधात मनसेने मोर्चा काढला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number