कमला मिल कंपाऊंड आगप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांची नार्को टेस्ट करावी; मनसे नेते संदिप देशपांडेंची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कमला मिल्स अग्नितांडवा प्रकरणी अग्निशमन दलाचा अहवाल समोर आला असून, या अहवालात मोजो पबमधील शेगडीमुळे ही आग लागल्याचे नमूद करण्यात आलंय. अग्निशनम दलाच्या अहवालानुसार, सुरुवातीला शेगडीत पेटलेल्या कोळश्यामुळे ही आग लागली. या आगीमुळे मोजोस बिस्ट्रोमधील पडद्यांनी पेट घेतला. त्यानंतर या आगीचे लोण वाढत गेले, आणि रुफ टॉपवर असलेल्या वन अबव्हचा […]

कमला मिल कंपाऊंड आगप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांची नार्को टेस्ट करावी; मनसे नेते संदिप देशपांडेंची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कमला मिल्स अग्नितांडवा प्रकरणी अग्निशमन दलाचा अहवाल समोर आला असून, या अहवालात मोजो पबमधील शेगडीमुळे ही आग लागल्याचे नमूद करण्यात आलंय.

अग्निशनम दलाच्या अहवालानुसार, सुरुवातीला शेगडीत पेटलेल्या कोळश्यामुळे ही आग लागली. या आगीमुळे मोजोस बिस्ट्रोमधील पडद्यांनी पेट घेतला. त्यानंतर या आगीचे लोण वाढत गेले, आणि रुफ टॉपवर असलेल्या वन अबव्हचा ताबाही आगीनं घेतला.

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला 29 डिसेंबर रोजी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.

मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान,  या घटनेनंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आता अग्निनशमन दलाच्या अहवालात या आगीसाठी मोजेस पबमधील शेगडी जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी कमला मिल कंपाऊंड परिसरातील आगप्रकरणी आयुक्तांनीच नार्को टेस्ट करावी, अशी मागणी मनसे नेते संदिप देशपांडेंनी केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number