जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई उपनगरात दोन ठिकाणी मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. भांडुपच्या सह्याद्री हायस्कूल येथे मनसेचे भांडुप विभाग अध्यक्ष संदीप जळगांवकर तर वर्सोवा येथील वेल्फेअर हायस्कूल येथे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्यावतीने या मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते.

गेल्या तीन दिवसांपासून मिसळ महोत्सव सुरु असून मिसळ रसिकांनी मोठ्या प्रमाणावर महोत्सवाला हजेरी लावली होती. राज ठाकरे यांनीदेखील या महोत्सवाला हजेरी लावली. मराठी उद्योजकांना या निम्मिताने एकत्र करणे हा या महोत्सवामागचा राज ठाकरेंचा उद्देश असल्याचं मनसेचे भांडुप विभागाध्यक्ष संदीप जळगावकर यांनी सांगितले.