जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पद्मावती चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला विरोध करणे ही चुकीची बाब आहे. तसेच, चित्रपट पाहिल्याशिवाय राजपूत समाजाने त्याला विरोध करू नये, असे आवाहन करतानाच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह भाग असल्यास त्याबाबत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बुधवारी स्पष्ट केले.
तसेच न्यूड या चित्रपटाला गोवा फिल्म फेस्टिव्हल मध्ये मिळालेली वागणूक निषेधार्ह असून केंद्रीय प्रसारण विभागाचा निषेध करण्यासाठी अनेक मराठी कलावंतांसह आपण गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार नाही. असेही अमेय खोपकर म्हणालेत.