कुर्ल्यात मनसे कार्यकर्त्यांकडून रिक्षाचालकांना मारहाण

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई कुर्ल्यात रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे मनसेकडून रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आली आहे. कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ मनसेचे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन नांदगावकर आणि मनसे कार्यकर्त्य़ांनी मुजोर रिक्षाचालकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. येथील रिक्षा चालक दारु पिऊन वाहन चालवतात असा मनसेचा आरोप असून मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समोरच रिक्षा चालकांना मारहाण केल्याचे पाहायला […]

कुर्ल्यात मनसे कार्यकर्त्यांकडून रिक्षाचालकांना मारहाण

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

कुर्ल्यात रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे मनसेकडून रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आली आहे.

कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ मनसेचे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन नांदगावकर आणि मनसे कार्यकर्त्य़ांनी मुजोर रिक्षाचालकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

येथील रिक्षा चालक दारु पिऊन वाहन चालवतात असा मनसेचा आरोप असून मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समोरच रिक्षा चालकांना मारहाण केल्याचे पाहायला मिळाले.

मात्र या मारहणीदरम्यान पोलिसांनी बघ्याची भूमिका पार पाडली आहे. तसेच या मारहाणीदरम्यान मनसे कार्यकर्त्यांना रिक्षाचालकाच्या खिशात स्क्रू ड्रायव्हर सापडले आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number