फेरीवाल्यानंतर मनसे आणखी एका मुद्द्यावर झाली आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   फेरीवाला अंदोलनानंतर मनसे आता पुन्हा एकदा आक्रमक झालेय. यावेळी मनसेने कचरा प्रश्नावरुन नवी मुंबई महापालिकेला धाब्यावर धरलय. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण होत नसल्याचं सांगून नवी मुंबई महापालिका प्रशासनानं मंगळवारपासून  घणसोली कॉलनीत कचरा उचलणं बंद केलय. त्यामुळे सोसायट्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालय. या कॉलनीमध्ये 60 हजार पेक्षा जास्त नागरिक राहतात. […]

फेरीवाल्यानंतर मनसे आणखी एका मुद्द्यावर झाली आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

फेरीवाला अंदोलनानंतर मनसे आता पुन्हा एकदा आक्रमक झालेय. यावेळी मनसेने कचरा प्रश्नावरुन नवी मुंबई महापालिकेला धाब्यावर धरलय.

ओला आणि सुका कचरा वर्गीकरण होत नसल्याचं सांगून नवी मुंबई महापालिका प्रशासनानं मंगळवारपासून  घणसोली कॉलनीत कचरा उचलणं बंद केलय.

त्यामुळे सोसायट्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालय. या कॉलनीमध्ये 60 हजार पेक्षा जास्त नागरिक राहतात.

कोणतीही पूर्वकल्पना न देता महापालिका प्रशासनानं कचरा उचलणं बद केल असल्याचं स्थानिक रहिवाश्यांच म्हणणं आहे. त्यामुळे 24 तासात कचरा न उचलल्यास विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा मनसेने दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number