Homeमहाराष्ट्र रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व फेरीवाले गायब मनसेचा दणका
रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व फेरीवाले गायब – मनसेचा दणका
जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मनसेच्या खळ्ळ खट्याकचा चांगलाच परिणाम दिसून आलाय. शनिवारी मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाईचं अस्त्र उगारलं होतं. मात्र, त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसला नाही. पण रेल्वेच्या पादचारी पुलावर अजुनही काही फेरीवाले धंदा करत आहेत.