जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नवी मुंबई आणि कामोठेमध्ये फेरीवाल्यांना मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला होता. आता हा वाद चांगलाच चिघळणार असल्याचं दिसून येतंय.
कारण सीबीडी पोलिसांनी बेलापुरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या आहेत.
पोलिसांनी प्रथम त्यांना कायदा शिकवावा आणि त्यानंतर आम्हाला नोटीसा पाठवा असं मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटलंय.