जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मनसे आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यात वाद सुरू आहे. तो वाद आज विकोपाला गेल्याचं चित्र निर्माण झालंये.
शनिवारी संजय निरुपम यांच्या घाटकोपरच्या सभेत मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातला. घाटकोपरच्या नायडू कॉलीनीत संजय निरुपम यांची सभा सूरू होती. यावेळी सजंय निरूपम व्यासपीठावर येताच मन सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत व्यासपिठावर जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलये.